ब्लॉग का ?

जय भीम मित्रांनो ! 

आज वर सोशल मीडिया वर छोट्या मोठ्या पोस्ट सोडल्या तर फार काही अॅक्टिव होत नव्हतो. एका अर्थाने ते फक्त reaction होते. सोशल मीडिया च महत्व जाणून आहे परंतु कधी विस्ताराने आपली भूमिका मांडावी याची गरज भासली नव्हती. आता मात्र लिहिण्याच ठरवलं आहे. काही कारणं इथे देवू इच्छितो. 

एक, सद्य राजकीय, सामाजिक परिस्थिति ही अतिशय विस्थ्फोटक आहे. या घडीला सम्यक आणि पुरोगामी विचारांची बाजू लढवणे आता अपरिहार्य आहे. कुठलाही आडपडदा न ठेवता या लढ्या मध्ये उतरावे लागेल. 
दोन, एक प्राध्यापक म्हणून समाजापर्यंत पोहोचणे हे माझे कर्तव्य आहे. आजूबाजूला प्रचंड प्रमाणात उलथापालथ होत असताना स्वत:च्या: मनात जे चालले आहे तेही इतरांसमोर यावे अशी तीव्र भावना गेल्या काही काळापासून निर्माण झाली आहे. कोठेतरी एक खंत टोचत होती स्वत:च्या : शांत असण्याची. तिच्यावर मात करणे आता गरजेचे आहे. 

आशा आहे की एक वाचक, जाणकार, आणि मित्र म्हणून आपण वेळोवेळी योग्य प्रतिक्रिया देत राहाल. 

आपला 

चंद्रशील 

Comments